Katraj : तोंडावर मिरचीपूड टाकून पाच लाख रुपये असलेली बॅग हिसकावली

रात्री साडेनऊची घटना

एमपीसी न्यूज – कात्रज चौकात एका व्यक्तीच्या तोंडावर मिरचीपूड टाकून त्याच्या जवळील पाच लाखांची रोख रकम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना आज (रविवार) रात्री 9.28 मिनिटांनी घडली. 

बॅग घेऊन चोरटे कात्रज येथून कोंढव्याच्या दिशेने गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. दरम्यान, पीडित व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.