Kothrud : मायविंग होंडा शोरुममध्ये सव्वादोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील मायविंग होंडा शोरूममध्ये तब्बल सव्वादोन लाखांची चोरी करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी सहा या वेळेत घडली. याप्रकरणी दीपक झुरंगे (वय 40, रा. हडपसर) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मायविंग शोरुम रात्री बंद असताना चोरट्यांनी पाठीमागच्या दरवाजाने प्रवेश करून कॅशिअर केबीनमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले दोन लाख 30 हजार 825 रुपये चोरून नेले. तसेच शोरुमची काच फोडून नुकसानही केले.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.