Pune : पुणे स्टेशन जवळ इसमाकडून मोपेडसह 41 हजारांचा ऐवज हिसकावला

एमपीसी न्यूज – पुणे स्टेशन जवळ अलंकार चौकात एका इसमाकडून तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या मोपेड गाडीसह 41 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावला. ही घटना काल मंगळवारी पहाटे दीड वाजता घडली.

सौरभ रणधीर (वय 26, प्रायव्हेट रोड, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हे पुणे स्टेशनच्या आऊट गेट समोरील अंलकार चौकात येणा-या रोडवर प्रितम रेस्टॉरंट समोर थांबले होते. यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळून त्यांची मोपेड (क्रमांक एमएच 12 क्यूएन 8447), एक मोबाईल आणि मनगटी घड्याळ असा एकूण 41 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला.बंडगार्डन पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.