Talegaon dabhade : भरदिवसा पावणेचार लाखांंची घरफोडी

ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळूंज यांच्या बंगल्यात चोरी

एमपीसी न्यूज – भरदिवसा गजबजलेल्या वस्तीमध्ये ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळूंज यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 75 हजार रुपयांचा माल लंपास केला. 

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये वाळूंज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळूंज यांचे कुटुंबीय विवाहानिमित्त बाहेरगावी गेले आहे. वाळूंज हे एकटेच घरी होते.  आज (दि 25) सकाळी 10 वाजता काही महत्वाच्या कामासाठी ते कामशेत येथे गेले होते. त्या ठिकाणचे काम करून 12 वाजता ते पुन्हा आपल्या निवासस्थानाकडे आले.

बंगल्याच्या मेन गेटला लावलेले कुलूप उघडून ते आतमध्ये गेले असता त्यांना बंगल्याचा मुख्य दरवाजाची कडी कोंयडा व इतर कुलूपे तोडल्याचे दिसले. चोरट्याने बंगल्यात प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातून व ड्रेसिंग टेबलमधून सुमारे 7 तोळे सोन्याचा ऐवज तर पिशवीतील सव्वा दोन किलो वजनाची चांदीची भांडी व रोख रक्कम 46 हजार रुपये असा सुमारे 3 लाख 75 हजार रुपये रक्कमेचा माल चोरून अज्ञात चोरट्याने पोबारा केला.

या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला कळविताच गुन्हे अन्वेशन शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या सहका-यांनी घटना स्थळी भेट दिली व पुढील सुचनेनुसार ठसे तज्ज्ञ, गुप्तचर यंत्रणा यांना पाचारण केले. त्यानुसार या यंत्रणेने पाहणी केली आहे. 29 एप्रिल निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भर बाजार पेठेतील एका महिलेचे हातपाय बांधून चोरट्यांनी मोठी चोरी केली होती. ती देखील भर दुपारीच केली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.