Pimpri : ‘सोशल मीडिया एक्स्पर्ट’ नेमणुकीखाली सत्ताधा-यांकडून जनतेच्या पैशांची लूट – नाना काटे

भाजपकडून कार्यकर्ते  पोसण्यासाठी जनतेचा पैशांचा वापर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी ‘सोशल मीडिया एक्सपर्ट’ पदाच्या ‘गोंडस नावाखाली’ पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोसण्याचे काम केले आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी जनतेच्या पैशांचा वापर केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘सोशल मीडिया एक्स्पर्ट’पदी अमोल देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांना दरमहा 70 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. परंतु, देशपांडे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पक्षाच्या प्रचारासाठी महापालिकेच्या पैशांचा वापर केला जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी ‘सोशल मीडिया एक्स्पर्ट’ नेमणुकीला विरोध केला आहे. काटे यांनी म्हटले आहे की, सत्ताधारी भाजप सोशल मीडिया एक्सपर्ट पदाच्या ‘गोंडस नावाखाली’ पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोसत आहे. बहुमताचा जोरावर भाजपकडून करदात्यांच्या पैशांचा उपयोग पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी केला जातो.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यापासून अनेक कामांमध्ये सल्लागार समिती नेमली गेली आहे. शहरात चालू असणाऱ्या विकास योजनांची माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर सर्व नागरिकांना मिळते. परंतु, स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांनी कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी नव्याने सोशल मीडिया एक्सपर्ट पदाला विरोधकांचा विरोध न जुमानता मंजूर दिली आहे.

अनेक कामांसह वेगवेगळ्या सल्लागार एक्सपर्टच्या नेमणुकीखाली जनतेचा पैसा लुटण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. स्थायी समितीत “विटामिन एम” वरून रोज ‘तु तू मै मै’ सुरू असल्याचे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. जनतेचा पैसा लुटणार्‍या सत्ताधाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असेही काटे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.