Pune : अॅमेझॉन गोडाऊनवर सशस्र दरोडा टाकणा-या तिघांना केले जेरबंद

एमपीसी न्यूज – अॅमेझॉन गोडाऊनवर 26 ऑक्टोबरला पहाटे साडेतीनच्या दरम्यान सशस्र दरोडा टाकणा-या तिघांना पोलिसांनी केवळ 14 दिवसांच्या आतच जेरबंद केले आहे.

सत्यवान ऊर्फ आप्पा श्रीमंत गाडगे(रा. वाघोली), निशांत अनिल ननावरे(रा. हडपसर), आकाश अशोक राठोड(रा.वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन गोडाऊनवर 26 ऑक्टोबर ला पहाटे साडेतीनच्या दरम्यान सशस्र दरोडा पडला होता. या दरोड्यातील आरोपींचा कसोशीने तपास चालू असताना पोलिस उपनिरीक्षक पिंगळे यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा दरोड्यानंतर केवळ 14 दिवसांच्या आतच शोध घेतला. विमानतळ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तीन आरोपींना  ताब्यात घेऊन त्यांना जेरबंद केले. त्याचबरोबर या दरोड्यात आणखी दोघेजण सामील असून त्यांनी चोरीच्या दोन चारचाकींचा दरोड्यासाठी वापर केला होता. दरोड्यातील उर्वरीत दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पुणे शहरात आणखी गुन्हे केले असल्याचे तपासात उघडकीस आले असून पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक रमेश साठे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे व तपास पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.