Kothrud : भरदिवसा गोळीबार करून सराफाला लुटले!

एमपीसी न्यूज – कोथरूडमध्ये आनंदनगर भागातील पेठे ज्वेलर्स येथे भरदिवसा गोळीबार करून एका सराफाला लुटण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सुरुवातीला पिस्तूलीचा धाक दाखवत दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यास सुरुवात केली. मात्र, तेथील कामगारांनी विरोध केला असता चोरट्यांनी हवेत दोन वेळा गोळीबार करून तब्बल 30-35 लाखांचे दागिने घेऊन चांदणी चौकाच्या दिशेने पसार झालेत.

दरम्यान, पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी अथवा मृत झाले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.