Pune :  वाहतूक नियमनात होणार आता ‘रोबोटची’ मदत

एमपीसी न्यूज-  वाहतूक नियमन आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आता रोबोटचा वापर होईल.एसपी रोबोटिक्स मेकर लॅबच्या विद्यार्थ्यांनी हा रोबोट बनवला असून उद्या मंगळवारी (दि.15) या रोबोटची चाचणी करण्यात येईल. उद्याच्या यशस्वी चाचणीनंतर भविष्यात या रोबोचा उपयोग होणार आहे.

पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमित प्रयत्न केले जातात. वाहन चालकांकडून करण्यात येणाऱ्या वाहतूक नियमभंगामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात.अशा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या वेळी पुणे वाहतूक विभागाने नवीन शक्कल लढवली आहे.

पुणे शहरातील वाहतूक नियमनात पादचारी यांना रस्ता ओलांडण्यास आणि वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन करण्यात रोबोटचा वापर करण्याची कल्पना पोलीस उप आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी केली असून यामध्ये पुण्यातील एसपी रोबोटिक्स मेकर लॅबच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा रोबोट विकसित केला आहे.उद्या 15 जानेवारी ला या रोबोटची चाचणी घेण्यात येणार आहे.

या रोबोटची चाचणी यशस्वी झाल्यास याचा फायदा वाहतूक पोलिसांना मोठ्या प्रमाणात होणार असून याचा वापर भविष्यात करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.