‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

'Rocky' will be meeting the audience on March 8

एमपीसी न्यूज – अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शनसीन आणि नायक-नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि या प्रेमवीरांच्या कुटुंबामधील नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘रॉकी’ हा मल्टीस्टारर चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम व्हिवर प्रोडक्शन्स आणि सेवेन सीज प्रोडक्शन्स यांनी केली असून प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंट यांची आहे.

रॉकी आणि संजना यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना अचानक काही अकल्पित घटनांना या दोघांना सामोर जावं लागतं. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक या चुकीच्या गोष्टी घडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॉकीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक ‘रॉकी’ कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी ‘रॉकी’ मध्ये पहायला मिळणार आहे

  • ‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे आणि अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील अभिनेते राहुल देव ही या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत.

असत्याविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक-नायिकेच्या प्रेमाची फोडणी अशा मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज असलेल्या ‘रॉकी’ चित्रपटाचे अनेक विशेष पैलू आहेत. बागी-२ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक ‘अदनान ए. शेख’ यांनी ‘रॉकी’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले आहे. सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे अर्थातच या चित्रपटातील साहस दृश्यं! ‘रॉकी’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटासाठी बॉलिवूडच्या आघाडीच्या शमशेर खान, आनंद शेट्टी या अॅक्शन मास्टरनी चित्तथरारक अॅक्शन चित्रीत केली आहे.

  • या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर आहेत. सुनिता त्रिपाठी या कार्यकारी निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शन अदनान ए शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान करणार आहेत. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. कलादिग्दर्शन संदीप कुनचीकोरवे तर नृत्यदिग्दर्शन अहमद खान, प्रिन्स गुप्ता अदनान ए. शेख’ यांचे आहे. वेशभूषा आशीष शर्मा यांची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.