Pimpri : घरगुती वादातून पत्नीला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात, कपाळावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली.

याप्रकरणी प्रकाश व्यंकटराव धंदर (वय 50, रा. वाघीरे कॉलनी, पिंपरीगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची मुलगी साक्षी हिने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून आरोपी धंदर व त्यांच्या पत्नीमध्ये गुरूवारी वाद झाला. यामुळे चिडलेल्या आरोपीने पत्नीच्या डोक्यात व कपाळावर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.