VadgaonMaval : सावित्रीच्या लेकींना सायकल भेट, शाळेला जाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ-येथील युवा उद्योजक रोहित सुदेशजी गिरमे यांच्या वतीने श्रीराम विद्यालय, नवलाख उंब्रे येथे मिंडेवाडी ठाकर वस्तीवरील ८ वी इयत्तेतील विद्यार्थीनींना ‘सायकल वाटप’ करण्यात आले. शाळेत जाण्यासाठी या विद्यार्थीनींना १० किमी ची पायपीट करावी लागत होती. याची दखल घेत रोहित गिरमे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ३ विद्यार्थीनींना सायकली भेट दिल्या. 

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई कदम, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, पु. जि. भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष कुंभार, सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, उद्योजक विक्रम कदम, संतोष नरवडे, उपसरपंच संदीप शेटे, उद्योजक गणेश भेगडे, व्याख्याते विवेक गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस सुदाम कदम, ओबीसी महासंघचे अध्यक्ष भरत कोकरे, शिवसेना विभागप्रमुख अमित कुंभार, उपसरपंच विशाल वहिले, उद्योजक विठ्ठल कारखानीस, बळीराम मराठे, संभाजी बधाले, शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष अमित भेगडे, रमेश सुतार, दिलीप आनंदे, पोटोबा देवस्थानचे विश्वस्त मंगेश खैरे, माजी विद्यार्थी अनिल बाबर, मधुकर शिंदे, प्रतिक गिरमे, कुंभार समाज युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष मकरंद कुंभार, मुख्याध्यापक गावडे सर, जालिदंर शेटे, आणि शिक्षक वर्ग व विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.