Rohit Sardana : आजतकचे न्यूज ॲंकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – आजतक या हिंदी वृत्तवाहिनीचे न्यूज ॲंकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. 40 वर्षीय रोहीत यांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. ट्वीट करुन त्यांनी आपली तब्येत सुधारत असल्याची माहिती दिली होती पण, सहा दिवसांनंतर त्यांचे निधन झाले.

रोहित सरदाना यांचे सहकारी व इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट करत रोहित सरदाना यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सरदाना हे सध्या आज तक वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. आज तक वृत्तवाहिनीवर रोहित सरदाना ‘दंगल’ नावाचा कार्यक्रम करत असत. आज तक वृ्तवाहिनीपूर्वी सरदाना झी न्यूजमध्ये कार्यरत होते. कोरोनामुळे भारतातील 100 हून अधिक पत्रकारांनी आपले प्राण गमावले आहेत. 22 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील तीन पत्रकारांचं निधन झालं होतं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.