Sports Award: ‘खेलरत्न’साठी रोहित तर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर, इशांत आणि दीप्ती शर्माची शिफारस

Rohit sharma for recomended Khel Ratna award and Shikhar dhawan, Ishant sharma and Deepti Sharma for Arjuna Award from bcci

एमपीसी न्यूज- टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा या तिघांची नावे पाठवली आहेत.

प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे पाठवत असते. 2019 मध्ये रोहित शर्मा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शिखर धवनचे नाव पुन्हा एकदा अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे.

यासोबत भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याचेही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे.

तसेच महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू दीप्ती शर्मा हिचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे.

युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाकडून अर्जुन पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2016 ते 30 डिसेंबर 2019 या कालावधीतील कामगिरी विचारात घेऊन अर्ज मागविण्यात आले होते.

या खेळाडूंच्या नामांकना बद्दल बोलताना BCCI अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, रोहित शर्मा याने शॉर्ट फॉरमॅट गेममध्ये जे यश मिळवले आहे, ते अतुलनीय आहे.

त्याने खेळाप्रती दाखवलेल्या सातत्य आणि प्रतिबद्धतेबद्दल खेळरत्नसाठी तो उचित खेळाडू आहे.

इशांत शर्मा कसोटी क्रिकेटमधील एक अनुभवी खेळाडू असून त्याचे क्रिकेटमधील योगदान अतुलनीय आहे. तसेच शिखर धवन सातत्याने चांगल्या धावा करत आहे.

ICC सामन्यात देखील त्यांने संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. महिला क्रिकेट संघातील दिप्ती शर्मा ही एक अष्टपैलू खेळाडू असल्याचे गांगुली यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.