Suresh Raina On Rohit Sharma: रोहित शर्मा भारताचा दुसरा धोनी – सुरेश रैना

Rohit Sharma India's second Dhoni says Suresh Raina ज्यावेळी कर्णधार तुमच्या सर्व गोष्टी ऐकत असतो. त्यावेळी साहजिकज समोरच्या खेळाडूलाही चांगलं वाटतं असं तो म्हणाला.

1

एमपीसी न्यूज – रोहित शर्मा संघ सहकाऱ्यांचे मत जाणून घेतो, इतर खेळाडूंना विश्वासात घेऊन काम करतो आणि एक कर्णधार जेव्हा असे काम करतो तेव्हा इतर खेळाडूंसाठी ही बाब फार महत्वाची असते, असे मत भारताचा तडाखेबाज फलंदाज सुरेश रैना याने सलामी फलंदाज रोहित शर्मा बद्दल मांडले आहे.

सुरेश रैना दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज ड्युमिनीच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता.

रैना म्हणाला की, मी असं म्हणेन की रोहित शर्मा भारतीय संघाचा दुसरा महेंद्रसिंह धोनी आहे. मी त्याला मैदानावर पाहिलं आहे. तो शांत असतो, प्रत्येकवेळी तो आपल्या सहकाऱ्यांची मत विचारात घेतो.

नवीन खेळाडूंना आत्मविश्वास देण्यापासून खडतर काळात संघाचं नेतृत्व करणं हे सर्व गुण त्याच्यात आहेत. ज्यावेळी कर्णधार मैदानात अशी चांगली कामगिरी करत असतो साहजिकच संघावर आणि ड्रेसिंग रुममध्ये त्यांचा चांगलाच परिणाम होतो.

रोहितच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना रैना म्हणाला, संघातला प्रत्येक खेळाडू हा कर्णधार आहे, असा रोहितचा पवित्रा असतो. मी आशिया चषकात त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे.

शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल यासारख्या खेळाडूंना आत्मविश्वास देताना मी त्याला पाहिलं आहे. ज्यावेळी कर्णधार तुमच्या सर्व गोष्टी ऐकत असतो. त्यावेळी साहजिकज समोरच्या खेळाडूलाही चांगलं वाटतं असं तो म्हणाला.

दरम्यान, भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे.

मंगळवारी आयसीसीने वन-डे क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट 871 गुणांसह पहिल्या तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like