Indian Cricket Team : भारतीय T20 संघाचे कर्णधारपद हिटमॅन रोहित शर्माकडे, न्यूझीलंड विरुद्ध सिरिजसाठी संघाची घोषणा

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्डकप मधील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. हा वर्ल्डकप विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून शेवटचा होता. यानंतर भारतीय T20 संघाचे कर्णधारपद हिटमॅन रोहित शर्माकडे सोपविण्यात आले असून, 17 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध सिरिजसाठी त्याच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची निवड केल्यानंतर तसेच रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर दोघांची ही पहिलीच सिरिज असेल. त्यामुळे दोघांच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. या सामन्यांसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून, आवेश खान, दीपक चहर आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आली आहे.

असा आहे संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, ईशान किशन, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, आवेश खान, दीपक चहर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक

  • 17 नोव्हेंबर – जयपूर
  • 19 नोव्हेंबर – रांची
  • 21 नोव्हेंबर – कोलकता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.