Rohit Sharma Tests Covid Positive : कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात; कसोटी सामन्यात टीम इंडियासमोर वाढले आव्हान

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Tests Covid Positive) याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत बीसीसीआयने  ट्वीट करत माहिती दिली आहे. भारत – इंग्लंड कसोटीसाठी काही दिवसच शिल्लक असताना कर्णधार शर्मा यास कोरोना लागण झाल्याने टीम इंडियाची अडचण वाढली आहे. 

कर्णधार रोहित शर्मा कोरोना विळख्यात सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी केलेली रॅपिड अॅन्टिज चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली शर्मा उपचार घेत आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये बीसीसीआय म्हणते, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी केलेली रॅपिड अॅन्टिज चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून सध्या रोहित टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.

Youth Murder Case :  मानेवर वार करून तरुणाचा खून; कडाचीवाडी येथील धक्कादायक प्रकार उघडकीस

भारत आणि इंग्लंडचा पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलै रोजी होणार आहे, परंतु कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Tests Covid Positive) यास कोरोनाची लागण झाल्याने टीम इंडीयासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.