Khel Ratna Award : रोहित शर्मा, विनेश फोगाट, मनिका बत्राची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांची यंदाच्या मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. रोहित आणि विनेश फोगाट यांच्याव्यतिरीक्त महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आलेली आहे.

रोहित शर्माने 2019 च्या विश्वचषकात पाच शतकं झळकावत बहारदार खेळी केली होती. बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारा साठी दिलं होतं. रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरु शकतो. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.

भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.