_MPC_DIR_MPU_III

Golmal Again Releasing In Newzeland: गोलमाल अगेन होणार न्यूझीलंडमध्ये प्रदर्शित

Rohit shetty's Golmal Again To Be Released In New Zealand आता न्यूझीलंड कोरोनामुक्त झाला आहे आणि तेथे चित्रपटगृहे पुन्हा उघडण्यात येणार आहेत. खास गोष्ट म्हणजे न्यूझीलंडमधील चित्रपटगृहे उघडताना अजय देवगणचा गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन चित्रपटांचे थिएटरमध्ये प्रदर्शन बंद आहे. जे चित्रपट प्रदर्शित होतात ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरच होतात. पण बॉलिवूडच्या चित्रपटांना परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बॉलिवूडमधील एक फेमस चित्रपट परदेशात प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट न्यूझीलंडमध्ये प्रदर्शित होणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

नुकतीच रोहितने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली असून त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘न्यूझीलंड सरकारने चित्रपटगृहांमध्ये गोलमाल अगेन पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पहिला हिंदी चित्रपट आहे जो कोरोनाशी लढा दिल्यानंतर न्यूझीलंडमधील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे’ असे म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

आता न्यूझीलंड कोरोनामुक्त झाला आहे आणि तेथे चित्रपटगृहे पुन्हा उघडण्यात येणार आहेत. खास गोष्ट म्हणजे न्यूझीलंडमधील चित्रपटगृहे उघडताना अजय देवगणचा गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

आज (दि.२५) हा चित्रपट न्यूझीलंडच्या चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. अजयचा याआधी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे त्याच्या होम प्रॉडक्शनचा तान्हाजी द अनसंग वॉरियर हा होता. त्याला तुफान यश मिळाले होते.

‘गोलमाल अगेन’ हा बॉलिवूडमधील एक हॉरर कॉमेडीचा तडका असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर प्रकाश राज, नील नितीन मुकेश, जॉनी लिवर, मुकेश तिवारी, संजय मिश्रा, मुरली शर्मा, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर आणि सचिन खेडेकर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.