Talegaon : रोटरी क्लबतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप 

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूराने बाधित झालेल्या आंबेवाडी, प्रयाग, चिखली, वनरगे, पाडळी या गावातील 700 कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. अन्नधान्य, कपडेस, औषधे इत्याची वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

कोल्हापूर जिल्ह्याची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अजय पाटील, गौरी पाटील यांनी पूरपरीस्थितीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यामध्ये गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळले. त्यानंतर रोटरी क्लबच्या पदाधिका-यांनी कपडे, अन्नधान्य, औषधे, शालोपयोगी साहित्य, रोख रक्कम स्वरुपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रोटरी क्लबच्या सदस्यांनी मोठी मदत केली.

प्रत्येक कुटुंबाला महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य, संसारउपयोगी साहित्य, औषधे, चटई, ब्लॅकेट, टॉवेल, बेडशीट, भांडी, सॅनेटरी, नॅपकीन, हॅन्डग्लोज, मास्क, प्रथमोपचार साहित्य, बिस्कीटे, मॅगी असे साहित्य दिले. तीन गावातील 700 कुटुंबीयांना हे साहित्य देण्यात आले.

क्लबचे सचिव दशरथ जांभूळकर, कार्याध्यक्ष विनसेंट सालेर, प्रकल्प अधिकारी अजय पाटील, सहप्रकल्प प्रमुख सुनील भोंगाडे, माजी अध्यक्ष प्रवीण भोसले, शंकर हदीमनी, राजेंद्र पंडित, विवेक ठाकूर, लॅटीस को.ऑपरेटीव्ह सोसायटीचे पदाधिकारी संतोष सावंत, सुहास जाधव, संतोष गुरुस्थळे, चंद्रकांत भुंडे, मयुर बावीसकर यांनी कोल्हापूरला जाऊन मदतीचे वाटप केले. मदत पोहचविण्यासाठी संतोष सावंत यांनी नि:शुल्क वाहन सेवा उपलब्ध करुन दिली.

जीवनावश्यक साहित्य गोळा करण्यासाठी रोटरी क्लब व्यतिरिक्त नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, लॅटीस, फ्लोरा को.ऑप हौसिंग सोसायटी,  मराठा क्रांती मोर्चा मावळ तालुका अशा विविध संस्थांचे सहकार्य लाभले.  नागरे हॉस्पिटलचे नितीन नागरे, डॉ. सुरभी नागरे, युनिक रुग्णालयाचे डॉ. विजय इंगळे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश भेगडे, तुषार वहिले, भाऊ ढोरे यांनी औषधे उपलब्ध करुन दिली.

या मदतीबद्दल आंबेवाडी गावचे सरपंच सिकंदर मुजावर, चिखलीचे सरपंच पांडुरंग पाटील, वरणगी पाडळीचे सरपंच अजित पाटील यांनी आभार मानले.

या उपक्रमासाठी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, अध्यक्ष गणेश काकडे, उपाध्यक्ष सुमती निलवे, कार्याध्यक्ष विनसेंट सालेर, सचिव दशरथ जांभूळकर, खजिनदार सचिन कोळवणकर, प्रकल्प अधिकारी अजय पाटील, सहप्रकल्प प्रमुख सुनील भोंगाडे, सदस्य राजेंद्र पंडीत, संदीप शेलार, विवेक ठाकूर, माजी अध्यक्ष मच्छिंद्र घोजगे, प्रवीण भोसले यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.