Rotary Club : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब (Rotary Club) ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे मावळ परिसरातील शाळा व महाविद्यालयात मंगळवारी (दि.20) आठवी ते दहावीच्या विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांना स्वच्छता, होणारे विविध संसर्ग याबाबतही माहिती देण्यात आली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे, प्रेसिडेंट इलेक्ट रो.शाहीन शेख,प्रकल्प प्रमुख अँस्न शालिनी कडलग, रो.राजू कडलक,रो.संजय मेहता, रो.प्रशांत ताये,रो.तानाजी मराठे,रो.हर्षल पंडित, आधी पदाधिकाऱ्यांसह सर्व शाळांमधील शिक्षक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमांतर्गत कान्हे फाटा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कामशेत येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा, कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज कार्ला या तीनही शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. तसेच, आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. भविष्यकाळात होणारे संसर्ग रोखण्यासाठी कशा पद्धतीने हे नॅपकिन वापरावे याविषयी माहिती देण्यात आली. प्रत्येक शाळेत पाचशे सॅनिटरी नॅपकिनचे (Rotary Club) वाटप याप्रसंगी करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे पॅडमॅन रो.राजू कडलग हे गेली सात वर्ष क्लबच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या प्रोजेक्टसाठी सॅनिटरी नॅपकिन स्वखर्चाने उपलब्ध करून देतात. त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष रो. दीपक फल्ले यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Illegal Water Connections : अवैध नळजोड नियमितीकरणाच्या विशेष मोहिमेत केवळ 1573 अर्ज

रोटरी क्लब तर्फे घेण्यात येणाऱ्या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या, तर मुलींनी निसंकोचपणे आपल्या शंका विचाराव्यात याकरिता प्रोत्साहन दिले. रो.भगवान शिंदे यांनी रोटरी क्लब तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली, तर रो.रेश्मा फडतरे यांनी सॅनिटरी नॅपकिनच्या वापरा संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.