Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीने स्वीकारले 200 गणेशमूर्तींचे दान 

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान चिंचवडच्या घाटावर मूर्तीदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला पिंपरी चिंचवड मधील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 200  गणेशमूर्तींचे दान केले. 
 
चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयासमोरील घाटावर सामाजिक संस्था व पर्यावरणवादी संघटनाच्या मदतीने मूर्तीदान उपक्रम राबविण्यात आला. नदीपात्रात गणपती विसर्जनामुळे नदीचे पाणी दूषित होते. त्यामुळे नागरिकांनी नदीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन न करता सामाजिक संस्थेस मूर्तीदान करावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी 200  गणेशमूर्तींचे दान केले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.