Ironmen felicitation : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने आयर्न मॅन चा सत्कार

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या पदाधिकारी मंडळाने (Ironmen felicitation)बुधवारी (दि.21) कझगिस्तान 2022 मधे सहभागी होवून आपल्या शहराच्या नावात भर घालणाऱ्या काही साहसी आयर्न मॅन चा सत्कार केला.

या स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या वैभव ठोंबरे,रोहित क्षिरसागर,सचिन वाकडकर,पांडुरंग बोडके,आणि पिंपरी चिंचवडचे एपीआय राम गोमारे या पाच आयर्न मॅन स्पर्धा विजेत्या आयर्न मॅन ना आज रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.

Bhosari missing cases : भोसरी पोलिसांनी हरवलेल्या 464 व्यक्तींचा एक वर्षाच्या आत लावला शोध

यावेळी आपल्या क्लबच्या वतीने प्रास्ताविक व्यक्त करताना अध्यक्ष संजय प्रधान यांनी रोटरी क्लबचे ध्येय आणि धोरणे अगदी थोडक्यात मांडली तर सचीव संतोष गिरंजे यांनी पुढील होणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.(Ironmen felicitation) या सोहळ्याचे सूत्रसंचालन सचिवसंतोष गिरंजे यांनी तर आभार प्रदर्शन रो मनीष फरांदे यांनी केले.

रोटरी क्लब ही संस्था नेहमीच सामाजिक ध्येयासाठी प्रसिद्ध आहे. समाजातल्या काही तरी वेगळे करणाऱ्या समाजबांधवांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे,कठीण प्रसंगी पाठीशी उभे राहणे असे संस्थेच्या वतीने नेहमीच केले जाते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.