Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने मावळ तालुक्यात शालेय स्तरावर ऑनलाईन माध्यमातून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २१ ऑक्टोबर रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.

तळेगाव दाभाडे- रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम.आय.डी.सी. तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मावळ तालुका शालेयस्तरीय ऑनलाइन देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील 125 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रोटरी क्लब तर्फे स्पर्धेचा निकाल रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम. आय. डी. सी. चे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अध्यक्ष रो. सुमती निलवे व प्रकल्प प्रमुख रो. मिलिंद शेलार यांनी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे जाहीर केला.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे –

  • इयत्ता 1 ली ते 4 थी गट

1)प्रथम क्रमांक- निकुंज हिवराज शरणागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी
2)द्वितीय क्रमांक- स्वरा राहुल पवार स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे,
3)तृतीय क्रमांक -श्रेयस महाले. आदर्श विद्यालय तळेगाव दाभाडे
4)उत्तेजनार्थ श्रीयुक्त जगताप माउंट सेंटॲन स्कूल तळेगाव दाभाडे

  • इयत्ता 5 वी ते 7वी गट

1)प्रथम क्रमांक ..रुद्राक्ष चेतन जाधव कृष्णराव भेगडे स्कूल तळेगाव दाभाडे,
2)द्वितीय क्रमांक- सृष्टी विजय खांजोडे* स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल. तळेगाव दाभाडे,
3)तृतीय क्रमांक – अथर्व विश्वनाथ ढोरे.प्रगती विद्या मंदिर इंदोरी.
4)उत्तेजनार्थ- कावेरी ठाकर, पवना विद्या मंदिर पवनानगर

  • इयत्ता 8 वी ते 10 वी गट

1)प्रथम क्रमांक.-साईराज तसनुसे, नवीन समर्थ विद्यालय तळेगांव दाभाडे.
2)द्वितीय क्रमांक- कु. श्रेया नवनाथ घरदाळे, पवना विद्या मंदिर पवनानगर
3)तृतीय क्रमांक.. तमन्ना सय्यद, पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे,                                                        4)उत्तेजनार्थ लयकाशा चांदबाशा शेख, कन्या शाळा क्रमांक 4 तळेगाव दाभाडे.

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दि 21 ऑक्टोबर 2021 रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगांव दाभाडे येथील कै. मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न होणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम. आय. डी. सी. अध्यक्ष रो. सुमती निलवे व सचिव रो. प्रविण भोसले यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.