Pimpri : केरळ पूरग्रस्तांसाठी  रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ

एमपीसी न्यूज – केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांसाठी देशभरांतून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधूनही रोटरी क्लब ऑफ निगडीने मदतीसाठी सरसावले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवडकरांचा केरळला पाठिंबा ही मोहिम सुरु केली आहे. पूरग्रस्तांच्यासाठी त्यादृष्टीने मदत पाठविण्याचे आवाहन या मोहिमेद्वारे केले होते. या आवाहनांला अनेकांचे हात पुढे आले. अन्नधान्य, तांदूळ, पाण्याच्या छोट्या बाटल्या, मेणबत्त्या, माचिस पेटी, पाणीशुद्धीकरणाच्या गोळ्या, सॅनिटरी नॅपकिन्स, बॅटरी, टॉर्च, बेडशीट, पडदे, ब्लॅन्केट, चपला आदी वस्तु पूरग्रस्तांसाठी गोळा करण्यात आल्या.

यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, राकेश सिंघानिया, विनोद बन्सल,अशोक लुल्ला, रो. रवी कदम आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.