Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे रविवारी स्वच्छ व सुंदर पवनामाई अभियान

एमपीसी न्यूज – जलपर्णीने चहुबाजूने वेढलेल्या पवना नदीतील रावेत ते दापोडीपर्यंतची जलपर्णी काढण्याचे काम महानगरपालिकेने सुरु केले असून, जलपर्णीचा मुख्य स्रोत असलेल्या सांडपाण्यावर तोडगा काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे रविवारी (दि.१ ) उगम ते संगम सांडपाणी व प्रदूषण मुक्त स्वछ सुंदर पवनामाई अभियान राबण्यात येणार आहे.

नाल्याद्वारे पवनानदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी व दुषित पाण्यामुळे दिवसेंदिवस जलपर्णीचे प्रमाण वाढत असल्यामुळे रोटरी कल्ब ऑफ वाल्हेकरवाडीने या समस्येच्या  मुळावर काम करायचे ठरवले आहे. नाल्याद्वारे पवना नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी बंद करणे तसेच त्यांना ड्रेनेजला जोडण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने पुढाकार घेतला असून रविवारी (दि.१) सिम्बायोसीस कॉलेज किवळे येथील नाल्यावर काम करण्यात येणार आहे.

रावेत बंधारा दुषित करणारे किवळे तसेच देहूरोड व मामुर्डीमधून वाहणारे नाले बंद करणे ही या अभियानाची प्राथमिकता असणार आहे. यापूर्वी वाल्हेकरवाडी येथील सांडपाणी नाला रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने ड्रेनेजला जोडला होता. अभियानामध्ये सहभागी होऊ  इच्छुकांनी रविवारी (दि.१) किवळे येथील सिम्बोयसीस कॉलेजसमोर  सकाळी 8 वा.  एकत्र येण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे आवाहान करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.