Rotary Club : जागतिक शांतता दिनानिमित्त रोटरी तर्फे शांतता फेरीचे आयोजन

एमपीसी न्यूज : जागतिक शांतता दिनानिमित्त 21 सप्टेंबर रोजी निमित्त रोटरी क्लब (Rotary Club) ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे शातंता फेरीचे आयोजन करण्यात आले. यात संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.6 च्या 255 विद्यार्थ्यांनी जागतिक सहभाग घेतला. शाळेत विद्यार्थ्यांना शांततेचे प्रतिक असलेल्या महामानवांचे महत्त्व व जगाला युद्धाची गरज नसून शांततेची गरज आहे, या विषयावर व्याख्याते पर्यवेक्षक भीमराव माने यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान झाले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष मा.रो. संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Vadgaon Maval : पक्षांतरात सामाजिक बांधिलकी दिसतच नाही – जयंत पाटील

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याच्या हस्ते (Rotary Club) दीप प्रज्वलन करून झाली रो. बाळासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विल्सन सालेर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जागतिक शांततेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

सुत्रसंचालन निकीता शितोळे यांनी केले रो. डॉ. नितीन नागरे , खजिनदार रो.रवी दंडगव्हाळ, प्रकल्प प्रमुख रो. सुषमा गराडे रो.सुवर्णा मते रो. पांडुरंग पोटे सर रो. लक्ष्मण मखर सर, रो.रूथ सालेर रो.दिपक बागल व विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनिता तिकोने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश ओव्हाळ व सर्व शिक्षकांनी तसेच पब्लिक इमेज डायरेक्टर रो. योगेश शिंदे रो.संदीप मगर यासर्वांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन AGA रो. शंकर हदीमणी सर यांनी केले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.