Pimpri : रोटरी क्लब पिंपरीतर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – पलूस (सांगली) येथे रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे ५०० शालेय मुलांना किट देण्यात आले आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.  ब्लँकेट, नाईट ड्रेस, शाळेचा गणवेश, जॅकेट, उशी, इत्यादी समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

या किट वितरणावेळी कॅनडा हून आलेले सेवा प्रकल्प भागीदार उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष कृष्णा सिंघल, अभिजीत शिंदे, मेहुल परमार, राजेंद्र भोसले, संदीप डांगे, नंदकिशोर शर्मा आदी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.