Pune : संवेदना बोथट होऊ देऊ नका – मोहन पालेशा

रोटरी क्लब प्रिस्टिन ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स ' चे वितरण

एमपीसी न्यूज- समाजात सुशिक्षितांमधे तरलता हरवत चालली आहे, जाणिवा बोथट होत चालल्या आहेत, या संवेदना तरल राहणे हीच आजची गरज आहे, असे मत रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी व्यक्त केले. समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी झटणाऱ्या संस्थांचा गुणगौरव करणारे ”रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स ‘ चे वितरण एका विशेष सन्मान सोहळ्यात करण्यात आले. त्यावेळी पालेशा बोलत होते.

यावेळी ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन’ चे अध्यक्ष संजय बडवे,सचिव राहुल कडगे , संचालक माणिक नाईक ,निमंत्रक अंजली मेहंदळे उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘केअर एन एक्स ‘ (CareNX ),मूलभूत शिक्षण आणि साक्षरतेमधील योगदानाबद्दल ‘ग्राममंगल ‘संस्था , आर्थिक -समाजविकसनातील योगदानाबद्दल ‘ज्ञानप्रबोधिनी ‘ संस्थेला तसेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र कलोपासक ‘ संस्थेला या कार्यक्रमात गौरविण्यात आले .

रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्याहस्ते हे पुरस्कार दिले गेले. ‘केअर एन एक्स ‘ चे शिरीष वसू, आदित्य कुलकर्णी, ज्ञानप्रबोधिनी’ च्या सुवर्णा गोखले, पूर्वा देशमुख, मनीषा शेटे, ‘ ग्राममंगल’ च्या आदिती नातुरे, सुषमा पाध्ये, ‘ महाराष्ट्र कलोपासक’ चे राजन ठाकूरदेसाई, अनंत निघोजकर यांनी सन्मान स्वीकारला.

मोहन पालेशा म्हणाले,” समाजात सुशिक्षितांमधे तरलता हरवत चालली आहे,जाणिवा बोथट होत चालल्या आहेत, या संवेदना तरल राहणे हीच आजची गरज आहे.नाविन्यपूर्ण काम हाती घेणे यालाच खूप हिम्मत लागते, जी आजच्या पुरस्कारार्थींमधे दिसते. स्वतः पलीकडे समाजहिताचा विचार करणे हीच मूल्ये आपण स्वत:मधे मुरवली पाहिजे. तर जगातील सर्व समस्या मिटतील”

प्रास्ताविक अंजली मेहेंदळे यांनी केले. सुदीन आपटे, संदीप संदीप बेलवलकर, सिद्धी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मुळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.