Talegaon Dabhade : पणन महामंडळाच्या कोविड सेंटरला रोटरीकडून गॅस गिझर प्रदान

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पणन महामंडळाच्या परिसरात कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्या सेंटरमध्ये रुग्णांना चांगली सोय व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या वतीने गॅस गिझर देण्यात आला. या गॅस गिझरचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि.26) पार पडला.

संस्थापक रो विलास काळोखे यांनी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी तर्फे डॉ थोरात यांच्या कडे गिझर सुपूर्द केले.
यावेळी रो दिलीप पारेख, प्रकल्पप्रमुख माजी अध्यक्ष रो संतोष शेळके,किरण ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मेहता, प्रदीप टेकवडे,तानाजी मराठे,संतोष परदेशी, प्रशांत ताय,नितीन शाह यांनी प्रयत्न केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.