Rotary Club : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे गुलाबी शाळेस पेयजल प्रकल्प प्रदान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Rotary Club) एमआयडीसी तर्फे तळेगाव दाभाडे येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 06 (गुलाबी शाळा) या शाळेला पेयजल प्रकल्प (वॉटर फिल्टर) प्रदान करण्यात आला. याचे उद्घाटन 27 सप्टेंबर रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा रजनीगंधा संतोष खाडंगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. विन्सेंट सालेर, सचिव मिलिंद शेलार, रो. डॉ. सुरभी नागरे उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने सदर फिल्टर प्लॅन्ट दुरूस्त कार्यान्वित करण्यात आला. या उपक्रमास कै. बाळासाहेब सुदाम केदारी, कान्हे मावळ यांच्या स्मरणार्थ केदारी परिवाराच्या वतीने सहकार्याने करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी.सी.चे संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खाडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Talegaon Dabhade : संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिर उत्साहात

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख रो. प्रविण भोसले, रो.बाळासाहेब शिंदे, रो.रवी दंडेलवाल, रो.डॉ.युवराज बढे, रो.अंतोष मालपोटे,रो.योगेश शिंदे,शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनिता तिकोणे, सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.