Pimpri : देशांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखणा-या प्रशासनाचे रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडतर्फे कौतुक

एमपीसी न्यूज – देशाच्या सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देऊन सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर प्रशासन देशांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था चोख राखत आहे. त्यामुळे सैनिकांचे कौतुक करत असताना देशांतर्गत सुव्यवस्था राखणा-या सरकारी कर्मचा-यांचा गौरव करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे, आपले कर्तव्य आहे. हाच धागा पकडत रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडने ‘शुक्रिया ए वतन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी कर्मचा-यांचा सन्मान केला.
 

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेजमध्ये झालेल्या ‘शुक्रिया ए वतन’ या कार्यक्रमासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, प्रणव लेले, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डॉ. डी. वाय. पाटील एसीएसचे अध्यक्ष पुनीतजोलीन माने, दिग्विजय हांडे, सिद्धांत अगरवाल, उमर इनामदार, तेजस समर्थ, तुषार समर्थ, गोपाल सावंत, विकास काकारपार्थी, ओमंग कुमार थामन, नीरज कुमार, स्वप्नील कोल्हे, प्रितेश पोरेड्डी, सई सोहनी, यशराज खंडागळे, निश्चय वर्मा, गुंजन चौधरी, विप्लव आदी उपस्थित होते.
 
रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि डॉ. डी. वाय. पाटील एसीएस कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी दिवस रात्र काम करतात. ते करत असलेल्या प्रामाणिक कामामुळे आपले जीवन सुखकर होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांप्रति या कार्यक्रमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी पोलीस, अग्निशमन दल, स्वच्छता आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.