Bhosri : कंपनीच्या कोऱ्या चेकवर खोट्या सह्या करून लुबाडले तब्बल पावणे दोन कोटी

एमपीसी न्यूज – कोऱ्या चेकवर खोट्या सङ्या व कंपनी चा खोटा शिक्का यांचा गैरवापर करत एकाने तब्बल पावणे दोन कोटी लुबाडले आहेत. हा प्रकार 2 नोव्हेंबर 2022 ते 4 मे 2023 य़ा कालावधीत एमआयडीसी भोसरी (Bhosri) येथील ईलेक्ट्रोडाईन प्रा .लि. या कंपनीत घडला आहे.

Dehuroad : घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

याप्रकऱणी एमयाडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अंकेत प्रदिप जैन (वय 38 रा.मुंबई) यांनी फिर्याद दिली असून निलकंठ मच्छिंद्र पाटोले (रा. भोसरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संबंधीत कंपनीत लिगल अडवायजर म्हणून काम पाहतात. आरोपीने कंपनीच्या चेकवर सही न घेता कंपनीचे बनावट लेझर बनवले. कंपनीचा शिक्का तयार केला तो शिक्का लेझरवर मारून चेकवर खोट्या सह्या करत कंपनीच्या खात्यातून वेळीवेळी असे एकूण 1 कोटी 84 लाख 44 हजार 500 रुपये काढून घेतले. हा सारा प्रकार निदर्शनास आल्याने कंपनीने आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एमआयडीसी भोसरी (Bhosri) पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.