Chicnchwad: सलमानी जमात प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल बॉईज संघ विजेता

एमपीसी न्यूज – समाजातील व्यावसायिकांना खेळाच्या माध्यमातून एकत्र येता यावे व सर्वांचे मनोमिलन व्हावे यासाठी सलमानी जमात वेलफेयर ट्रस्ट च्या वतीने आयोजित सलमानी जमात प्रीमियर लीग २०२० चा रॉयल बॉईज संघ विजेता ठरला

रॉयल बॉईज संघ विरुद्ध हाशमी इलेव्हन संघ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल बॉईज संघाने हाशमी इलेव्हनवर 22 धावांनी विजय मिळवला. चिंचवड येथील केशवनगरमधील श्री महासाधू मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शहरातील 18 संघानी सहभाग घेतला होता.

प्रथम क्रमांक 21 हजार रोख आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 11 हजार रोख आणि ट्रॉफी तर तृतीय क्रमांकास पाच हजार रोख आणि ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरसेवक सुरेश भोईर, विशाल वाकडकर, शेखर ओव्हाळ, मनीष आनंद, मक्कसूदभाई शेख, हबीब गफार शेख, मोइनुद्दीन शकील शेख आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या संयोजनात शकील शेख, खालील शेख, गुड्डू शेख, मुश्ताक शेख, असाद शेख आदींचे सहकार्य लाभले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.