IPL 2020 : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकाता वर आठ गडी राखून विजय

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूजकोलकता ने मर्यादित वीस षटकात काढलेल्या केवळ 84 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने हे लक्ष्य सहज पार केलं. बंगळुरूच्या संघाने 13.3 षटकांत दोन गड्यांच्या बदल्यात 85 धावा केल्या

 

 

कोलकाताला वीस षटकात केवळ 84 धावाच करता आल्या. 85 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा ॲराॅन फिंच आणि देवदत्त पडिकल सातव्या षटकात लाॅकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाले. फिंचने 16 तर पडिकल याने 25 धावा केल्या. त्यानंतर गुरुकिरत आणि विराट कोहलीने संघाला विजय मिळवून दिला. गुरुकिरत याने 21 आणि विराट कोहलीने 18 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.

 

 

त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानावर आली. परंतू मोहम्मद सिराजने एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांना माघारी धाडलं. यानंतर शुबमन गिल देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मैदानावर फटकेबाजी करु पाहणाऱ्या टॉम बँटनलाही सिराजने माघारी धाडले. मोहम्मद सिराजने एकाच सामन्यात दोन षटकं निर्धाव टाकून तीन बळी घेत आयपीएलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली.

 

 

कोलकताचा पूर्वकर्णधार दिनेश कार्तिकही फारशी चमक दाखवू शकला नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर 14 चेंडूत 4 धावा काढत तो माघारी परतला. चहलने पॅट कमिन्सला झेलबाद करत माघारी धाडलं. कोलकताचा कर्णधार मॉर्गन फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अखेरच्या षटकांत पडझड रोखत संघाला 84 धावांचा टप्पा गाठून दिला. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने 3, युजवेंद्र चहलने 2 तर नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.