Pimpri : ‘विश्वासात घेत नसल्याने महायुतीच्या प्रचारापासून आरपीआय अलिप्त’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप-शिवसेनेचे उमेदवार महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयला विश्वासात घेत नाही. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पोस्टरवर छायाचित्र टाकले जात नाही. पक्षाचे निळे झेंडेही वापरले जात नाहीत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून आरपीआय अलिप्त राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महायुतीतील आरपीआय महत्वाचा घटक पक्ष आहे. परंतु, भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांकडून आरपीआयचे अध्यक्ष, कार्यकारिणीला विश्वास घेतले जात नाही. पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे फोटो हँडबिल, पोस्टरवर वापरले जात नाहीत. पक्षाचे निळे झेंडेही वापरले जात नाहीत. तसेच शहरात अधिकृत अध्यक्ष व मुख्य कार्यकारणी अस्तित्वात असून देखील फक्त रिपाई महिला आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या प्रचारात स्थान दिले जाते. अध्यक्ष व मुख्य कार्यकारणीस टाळले जाते.

मित्र पक्षाने अगोदरच आमच्यावर अन्याय केला आहे. शहारातील आमचा बालेकिल्ला असलेला पिंपरी मतदार संघ आम्हाला दिला नाही. आम्ही नाराज असून सुद्धा रामदास आठवले हे पुढील आदेश देईपर्यंत भाजपा व शिवसेनाच्या प्रचारपासून अलिप्त’ राहणार आहोत. याबाबत अध्यक्ष आठवले यांना देखील कळविले आहे, असे पत्रात म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like