Pimpri : पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यास आरपीआय शिवसेनेचा प्रचार करणार नाही – सुरेश निकाळजे

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (A)  पार्टीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पिंपरीची जागा  आरपीआयलाच सुटली पाहिजे, अशी आग्रही मागणी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केली आहे. तसेच महायुतीत पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यास आरपीआय शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सुरेश निकाळजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी मतदार संघाची जागा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (A)लाच सुटलीच पाहिजे. पिंपरी मतदार संघ हा रिपब्लिकन पार्टीचा बालेकिल्ला आहे. 2014  च्या विधानसभा निवडणुकीत आरपीआयच्या उमेदवारास 48 हजार मते मिळाली होती. केवळ 2700 मताने आमचा पराभव झाला होता. यावेळेस पक्षाने मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे पिंपरी मतदारसंघ हा रिपब्लिकन पार्टीला सोडावा.

लोकसभेच्या निवडणकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरी मतदार संघात 41 हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. महायुती मध्ये जर पिंपरी मतदार संघाची जागा शिवसेनेस गेल्यास रिपब्लिकन पक्ष पिंपरी मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.