Pune News : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कापड व्यवसायिकाला 17 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : व्यवसाय वाढीसाठी 5 कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघांनी तरूणाला 17 लाख 52 हजारांचे बीटकॉईन खरेदी करायला सांगून गंडा घातला. ही घटना ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 कालावधीत स्वारगेटमध्ये घडली.

 

सूरज सूर्यवंशी (वय 45, रा. जनता वसाहत, पर्वती ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सूरज यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची एका मित्राच्या माध्यमातून दोघा आरोपींची ओळख झाली होती.

त्यानंतर दोघांनी सूरज यांना 5 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी 17 लाख 52 हजारांचे बीटकॉईन खरेदी करायला सांगून फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जी. एम. मोरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.