Wakad : पेट्रोल पंपावर काम करणा-या कामगारांनी केला सव्वा दोन लाखांचा अपहार

Wakad : Rs 2.5 lakh embezzled from petrol pump workers पेट्रोल पंपावर काम करणा-या कामगारांनी दहा महिन्यांच्या कालावधीत दोन लाख 24 हजार रुपयांचा अपहार केला. ही घटना वाकड येथील सुखवानी पेट्रोल पंपावर घडली.

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर काम करणा-या कामगारांनी दहा महिन्यांच्या कालावधीत दोन लाख 24 हजार रुपयांचा अपहार केला. ही घटना वाकड येथील सुखवानी पेट्रोल पंपावर घडली.

कुणाल राजू नागपाल (वय 28, रा. पॉवर हाऊस रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वैजिनाथ पाटील, सतीश हुले, सिद्राम जाधव आणि पेट्रोल पंपावर काम करणारे इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपी हे वाकड येथील सुखवानी पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांनी आपसात संगनमत करून त्यांच्याकडे सोपवलेल्या व्यवहारामध्ये अफरातफर केली.

आरोपींनी दहा महिन्याच्या काळात एकूण दोन लाख 24 हजार 582 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.