Dehuroad Crime News : पायलट होण्यासाठी सासरच्यांकडून घेतले 45 लाख रुपये; जवयासह 12 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नात हुंडा दिला नाही. मानपान केला नाही. यावरून विवाहितेचा छळ केला. त्याचबरोबर पतीला पायलट होण्यासाठी आणि फ्लाईंग कोचिंग सेंटर सुरु करण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेच्या वडिलांकडून 45 लाख रुपये घेतले आणि फसवणूक केली. हा प्रकार 26 एप्रिल 2016 ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत बिहार येथे घडला.

सासू अनितादेवी, नणंद शिल्पी शिखा, चुलत सासू मधू प्रियादेवी, चुलत सासरे मंजित यादव, दीर सन्नीकुमार, पती सौरभ कुमार, मामा वकील प्रसाद यादव, विकास यादव, संतोष यादव, रामप्रवेश यादव, ओमप्रकाश यादव, प्रवीणकुमार यादव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 14) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लग्नात हुंडा कमी दिला, लग्नात मानपान चांगला केला नाही या कारणावरून टोचून बोलून माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला.

पती सौरभकुमार याने पायलट होण्यासाठी व फ्लाईंग कोचिंग सेंटर टाकण्यासाठी खोटे बोलून फसवून वेळोवेळी विवाहितेच्या वडिलांकडून 45 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन त्याने फ्लाईंग कोचिंग सेंटर न टाकता वैमानिक होण्याचेही खोटे सांगून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. माहेरी आल्यानंतर विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.