Wakad : गणेश मूर्तींच्या स्टॉलमधून 50 हजारांची रोकड लंपास

Rs. 50000 cash stolen from Ganesh idols' stall.

एमपीसी न्यूज – डांगे चौकातील गणेश नगर येथील गणेश मूर्तीच्या एका स्टॉलमधून अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 22) दुपारी पाच वाजताच्या सुमारास घडला.

सचिन तानाजी कुंभार (वय 36, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचे डांगे चौकातील गणेश नगर येथे गणेश मूर्तींचा स्टॉल आहे. शनिवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्टॉलमधून 50 हजार रुपयांची रोख रक्कम लबाडीने चोरून नेली.

शनिवारी रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.