RSS Alandi : आरएसएस च्या आळंदी गटाचा शस्त्रपूजन समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या आळंदी गटाचा शस्त्रपूजन समारंभ रविवारी भोसरी येथील न्यू संत तुकाराम पॅलेस हॉल मध्ये संपन्न झाला.(RSS Alandi) यामध्ये 275 स्वयंसेवक व 250 नागरिक सहभागी झाले होते. प्रदक्षिणा संचालनम, मीयुद्ध, दंड, योगासन सूर्य, नमस्कार, सांघिक योग व स्थानिक पद्य ही प्रात्यक्षिके झाली. यामध्ये 275 गणवेशधारी स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला. अंदाजे अडीचशे नागरिक हा समारंभ पाहण्यास उपस्थित होते.

आळंदी इंद्रायणीनगर, भोसरी, मोशी, चऱ्होली आणि दिघी अशी सहा नगरे आळंदी गटात आहेत. या गटाची लोकसंख्या सुमारे 6 लाख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली असून हे 97 वे वर्ष आहे. प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब वाफारे,  एमआयटी कॉलेज, आळंदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. योगासनांच्या महत्त्व बद्दल बोलताना मापारी वाफारी यांनी योगासनांच्या महत्वाबद्दल मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की आजार दूर करायचे असतील तर योगासने हाच एक पर्याय आहे. पालक त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये घालत नाहीत. अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण विद्यार्थी उच्च पदावर गेले आहेत.(RSS Alandi)ज्या भारतात संस्कृत भाषा सुरू झाली तेथेच ती लोप  पावत आहे. जर संघाने संस्कृतचा प्रसार केला तर संस्कृत भाषा जीवीत राहील. जशी इंग्रजी भाषा आता काळाची गरज झाली आहे तशी संस्कृत ही काळाची गरज होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

fraud gang arrested : कर्ज देण्याच्या बहाण्याने सुमारे 185 जणांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

अतुल अग्निहोत्री, पश्चिम महाराष्ट्र प्रांत महाविद्यालयीन विभाग प्रमुख हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. ते म्हणाले की तुम्हीच त्यांनी इतिहासाचे विद्युत प्रकरण केले आहे. हिंदू समाजाच्या तत्कालीन परिस्थितीमुळे आपला देश पारतंत्र्यात गेला. हिंदू समाजात जातीवाचक शब्द नसून ती एक व्यापक संकल्पना आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन हा इंग्रजाळला आहे. तो बदलण्याची गरज आहे. संघाला आता समाज मान्यता मिळाली आहे.(RSS Alandi) त्यामुळे आता स्वयंसेवकांनी चार पावले पुढे जाऊन इतरांना सामावून घेतले पाहिजे. हिंदुत्वाची व्यापकता समजली पाहिजे. दहा हजार वर्षे हिंदुत्वाने वेगळा विचार दिला आहे. तो विचार आपल्याला सर्वत्र पोहोचवायचा आहे. आम्हाला अखंड भारत हवा आहे. ब्रिटिशांनी जगातील सत्ता देशावर राज्य केले हो त्यांना नंतर स्वतंत्र. त्यातील भारत हा एक मात्र देश आहे ज्याचे त्यांनी विभाजन केले.अग्निहोत्री यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की पुढील काळामध्ये अखंड भारत पुन्हा अस्तित्वात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.