RSS Dehu : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहू गट संभाजीनगर शाखेचा शस्त्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड जिल्हा अंतर्गत देहू गट (RSS Dehu) संभाजीनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा शस्त्र पूजनाचा कार्यक्रम रविवारी (दि.2) रामलीला मैदान हॉल जाधव वाडी येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गलोबल इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक व अध्यक्ष डॉक्टर ललित धोका, तर प्रमुख वक्ते म्हणून गिरीश प्रभुणे उपस्थित होते.

Pimpri-Chinchwad Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतले तणावमुक्तीचे धडे

यावेळी गिरीश प्रभुणे म्हणाले की,  भारत या अखंड प्रदेशाची महती व्यक्त करताना उपनिषदाच्या श्लोकांचा संदर्भ दिला आहे.  सत्याचे आचरण असेल या धर्माने अधर्मावर मात करण्याची शक्ती आराधना करून मिळवली तर शस्त्र हाती धरावे लागत नाही. काळाच्या ओघात आता  आक्रमणे झाल्याने हिंदुस्थानातील मोठा भाग खंडित झाला मात्र तरी या देशाची संस्कृती परंपरा विचारधारा श्रेष्ठत्व कसे टिकून आहे.(RSS Dehu) सूर्यासारखे तेज देणारा गावागावात शांती देणारा भारत निर्माण करण्यासाठी खरी वसुधैव कुटुम्बकम पद्धती आपण आणू व मेकॉलेने केलेले बौद्धिक आक्रमणाची स्वातंत्र्यानंतरही काही प्रमाणात जाणवणारी दाहकता परतवून लावण्यासाठी शस्त्र पूजनाच्या निमित्ताने वाटचाल करूया अशी अपेक्षा व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.