Pathsanchalan : रा.स्व.संघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात उद्या विजयादशमीनिमित्त 21 ठिकाणी पथसंचलन

एमपीसी न्यूज : राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्याने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. (Pathsanchalan) यावर्षी बुधवारी, 5 ऑक्टोबरला विजयादशमी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 21 ठिकाणी विविध भागातील नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन निघणार आहे. घोषाच्या तालावर हे संचलन होणार असून संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी विविध भागातील संचलनात सहभागी होतील. जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.

 

Eknath Pawar : सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश – एकनाथ पवार

 

विविध भागातील पथसंचलन स्थान व वेळ –

जैन मंदिर देहू आळंदी रोड, मुकाई चौक(किवळे), शिवभूमी शाळेजवळ यमुनानगर(निगडी), घरकुलच्या प्रवेशद्वारापाशी(चिखली), आल्हाटवाडी (मोशी), तनिष्क ऑर्चिड कॉर्नर, चऱ्होली बु., चौधरी पार्क कॉलनी ६, विजय नगर नं. 3 समोरील मैदान, दिघी, जलवायू विहारच्या बाजूचे मैदान, इंद्रायणी नगर, डाॅ. डि. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जवळ, संत तुकाराम नगर, पिंपरी, केशव माधव सोसायटी, फुगेवाडी, गजानन महाराज मंदिर सांगवी, गजानन महाराज मंदिर सांगवी, राजमाता जिजाऊ उद्यानाच्या शेजारी, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख बस स्टॉप, बेबीज इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी, कामगार कल्याण मंडळ मैदान, उद्योग नगर, चिंचवड, वनदेव नगर मैदान, थेरगाव, मेगा पोलीस, हिंजवडी, विश्वेश्वर शाखा मैदान, बिजली नगर व पाटीदार भवन, सेक्टर 26, प्राधिकरण उद्या पथसंचलन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.