Pune Crime News : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे 21 वर्षीय मुलाला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसीन्यूज : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली होती. त्यानंतर आज रवींद्र बऱ्हाटेचा मुलगा मयुरेश रवींद्र बऱ्हाटे याला अटक केली. रविंद बऱ्हाटेला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात रवींद्र बऱ्हाटे याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या कारणावरून तसेच फरार असणाऱ्या रवींद्र बऱ्हाटे याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगीता बऱ्हाटे (वय 55) हिला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आज मुलाला देखील अटक केली आहे.

रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या टोळीवर विविध पोलिस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. महारुद्र चतुशृंगी, हडपसर, कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बऱ्हाटे टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र बऱ्हाटे फरार आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर महसूल विभागाने त्याची मालमत्ता देखील जप्त केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.