RTO News : जप्त केलेल्या 28 वाहनांचा 10 मार्चला ई-लिलाव

एमपीसी न्यूज – मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 28 वाहनांचा जाहिर ई -लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी पिंपरी चिंचवड येथे 10 मार्च 2021 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे.

ही वाहने मोशी प्राधिकरण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात 1 ते 8 मार्च 2021 दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहिर ई लिलावात एकूण 28 वाहने उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, डी.व्हॅन, पिकअप व्हॅन, टूरिस्ट टॅक्सी, जेसीबी, एलएमव्ही कार या वाहनांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची वाहन मालकांना संधी राहील. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय- पिंपरी चिंचवड यांच्या सूचना फलकांवर नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.

इच्छुक व्यक्तींना वर नमूद केलेल्या स्थळी वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता यईल. जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 1 ते 3 मार्च 2021 या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.

हा लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी स्वतःकडे राखून ठेवले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.