RTO News : परिवहन विभागामार्फत शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ‘फेसलेस’ सुविधा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात परिवहन विभागाच्या फेसलेस (RTO News) सुविधेअंतर्गत 2022 मध्ये 2 लाख 6 हजार 402 तर सन 2023 मध्ये 30 हजार 103 शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत. एक प्रकारे या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. नागरिकांना ऑनलाईनपद्धतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन विभागाच्या 110 सेवांपैकी 22 सेवा फेसलेस पद्धतीने सुरु करण्यात आल्या असून नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन  प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे.

या सुविधेअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सन 2022 मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 1 लाख 12 हजार 278, उप प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत 77 हजार 441 आणि बारामती कार्यालयामार्फत 2022 मध्ये 16 हजार 683 असे एकूण 2 लाख 6 हजार 402 तसेच सन 2023 मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 16 हजार 775, उप प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत 12 हजार 374 तर बारामती कार्यालयामार्फत 954 असे एकूण 30 हजार 103 फेसलेस पद्धतीने शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत.

परिवहन कार्यालयामार्फत वाहन विषयक व अनुज्ञप्ती विषयक एकूण 110 सेवा नागरिकांना पुरविण्यात येतात. वाहन 4.0 व सारथी 4.0 या दोन संगणक प्रणाली सन 2017 पासून कार्यान्वीत आहेत. त्यापैकी 22 सेवा फेसलेस पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहन कर, पर्यावरण कर, शुल्क इत्यादी भरण्याकरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने सेवा उपलब्ध असून या कामाकरिता त्यांना कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही.

फेसलेस सुविधा –

अर्जदार कार्यालयामध्ये न येता फेसलेस पद्धतीने शिकाऊ अनुज्ञप्ती (RTO News) प्राप्त करुन घेण्याकरिता कार्यपद्धती खालील प्रमाणे आहे.  https://parivahan.gov.in या संकेतस्थळावरील सारथी प्रणालीवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. सदर अर्ज सादर करतांना प्रथम नविन शिकाऊ अनुज्ञाप्ती हा पर्याय निवडून सबमिट विथ आधार ऑथेंटिकेशन यावर क्लिक करावे. आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. सदर ओटीपी संगणकावर टाकावा. त्यापुढील संगणकीय खिडकीवर अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड करावी.

PCMC : वृक्षांच्या बियांपासून बनविले सीडबॉल्स!

सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शुल्क भरणा करण्यासाठीची खिडकी ओपन होईल, सदर ऑनलाईन शुलक् अदा केल्यानंतर रस्ता सुरक्षे संदर्भातील व्हिडीओची लिंक क्लिक करुन हा व्हिडीओ स्किप न करता संपूर्ण व्हिडीओ पहाणे अनिवार्य आहे. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्तीकरता 15 प्रश्न असलेल्या प्रश्नावली खुली होईल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ असेल. या चाचणीत किमान 9 गुण मिळाल्यास आपणास शिकाऊ अनुज्ञप्ती देण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.