Rto News : गुढीपाडव्याला 5 हजार 474 वाहनांची खरेदी

एमपीसी न्यूज – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपप्रादेशिक( Rto News ) पिंपरी-चिंचवड परिवहन विभागाकडे 15 ते 22 मार्च 2023 या कालावधीत एकुण 5 हजार 474 वाहनांची नोंदणी झाली असून त्यापोटी 32 कोटी 23 लाख 14 हजार 995 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये 482 इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश आहे.

 

 

Chinchwad News : एक्साईड इंडस्ट्रीज कंपनी विरोधात कामगारांचे पिंपरीत ठिय्या आंदोलन

 

 

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे गुढीपाडव्यानिमतित्त केवळ आठ दिवसांतच इंधनावर चालणारी 4 हजार 992 वाहने व 482 ई-व्हेईकल अशी एकूण 5 हजार 474 वाहनांची नोंदणी झाली. आकडेवारीनुसार दुचाकी वाहनांची संख्या सर्वात जास्त म्हणजेच 2 हजार 831 तर, ई-व्हेइकलची संख्या 432 इतकी आहे.

 

तसेच गुढीपाडव्यापूर्वीच अनेकांनी वाहन नोंदणी करून ठेवली होती. त्यामुळे मुहूर्तावर वाहन घरी नेता आले. त्यामध्ये ( Rto News ) मोटार कारची संख्या 1 हजार 735 इतकी असून ई-मोटार कारची संख्या 48 इतकी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.