RTO News : आरटीओची फसवणूक; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 7 नोव्हेंबर 2014 ते 2 मार्च 2021 या कालावधीत पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे घडली.

संदीप सुरेश कांबळे (वय 52, रा. जुना काटे पिंपळे रोड), सागर मारुती सूर्यवंशी (रा. पिंपरी कॅम्प), अमर मुलचंदानी (रा. पिंपरी), विनय विवेक आ-हाणा, अश्विन अशोक कामत (रा. 49, रा. लुल्लानगर, वानवडी), भल्ला महादेव कांबळे (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत./

याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रसाद पांडुरंग नलावडे यांच्या राहण्याच्या पत्त्याचा पुरावा म्हणून बनावट भाडे करारनामा आरटीओ कार्यालयात सादर केला. हा भाडे करारनामा बनावट असल्याचे हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात उघडकीस आले आहे.

आरोपींनी हा भाडे करारनामा आरटीओ कार्यालयात सादर करून एमएच 12 / एक्यू 0011 आणि एमएच 14 / ईके 7777 या वाहनांचे हस्तांतरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.