Rahatni : रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये रुबेला व गोवर लसीकरण मोहिम

एमपीसी न्यूज –   रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले   एजुकेशन  फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी रुबेला व गोवर लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत प्राथमीक ते दहावीपर्यतच्या ३३५ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिश उपस्थित होते.सुपरवायझर बाबासाहेब खरात, ज्योती शिंदे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे  डॉ. शिवाजी ढगे, शाळेचे शिक्षक व सुनीता पवार, जयश्री वाघमारे या परिचारिका यांनी शिस्तबध्द पध्दतीने लसीकरण मोहीम पार पाडली. लसीकरणानंतर विद्यार्थ्याना काही वेळ डॉक्टरांच्या निरीक्षण कक्षेमध्ये ठेवण्यात आले होते.

Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.