Rupali Thombare : राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणतात ‘या’ तिघांची खाती बदला, यांना गृहमंत्री करा….

एमपीसी न्यूज : महिनाभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रति 9 अशा 18 मंत्रांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला. आणि त्यानंतर खाते वाटप देखील करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह रचना विभागासह इतर खाते देण्यात आले आहेत. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री आणि इतर खाते देण्यात आले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare) यांना मात्र हे काय रुचले नाही. आणि त्यांनी मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्याची मागणी केली. यासंबंधी रूपाली ठोंबरे यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली.

त्यामध्ये त्या म्हणतात, अमित शहा साहेबांच्या मर्जीने विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारमधील मंत्रिमंडळात काही फेरबदल व्हावेत. अब्दुल सत्तार शिक्षण मंत्री, संजय राठोड महिला व बालकल्याण मंत्री आणि प्रकाश सुर्वे यांना गृहमंत्री करण्यात यावे असा खोचक टोला त्यांनी दिला. ठोंबरे यापूर्वी मनसेत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि त्या सातत्याने भाजप नेत्यांवर टीका करत आहेत. त्यानंतर त्यांनी आता वादग्रस्त असलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या नेत्यांना मंत्रीपद देण्यात यावी, असा (Rupali Thombare) खोचक सल्ला सरकारला दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या दृष्टीने आपल्याकडील काही खाती ही अन्य सहकारी मंत्र्यांना दिली आहेत. माहिती तंत्रज्ञान खाते उदय सामंत यांना, परिवहन शंभूराज देसाई यांना, पणन दादा भुसे, सामाजिक न्याय संजय राठोड, जलसंधारण तानाजी सावंत, मदत व पुनर्वसन अब्दुल सत्तार, पर्यावरण दीपक केसरकर आणि अल्पसंख्यांक विकास संदिपान भुमरे अधिवेशनापुरते वाटप मुख्यमंत्र्यांनी केले आहे. हे मंत्री त्यांना वाटून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खात्यांची उत्तरे सभागृहात देतील. या मंत्र्यांकडील मूळ खाती त्यांच्याकडे कायम असतील.

Amit Thackeray : पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंच्या साधेपणाने जिंकली नागरिकांची मने

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.